गावगाडा २००६ (भाग-१)
[त्रिंबक नारायण आत्रे यांचे गांवगाडा हे पुस्तक गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्र रेखाटते. प्रथम प्रकाशन १९१५ साली झालेले हे पुस्तक आजही उपलब्ध आहे. (‘वरदा’, पुणे, १९८९). मधल्या काळात पुस्तकातील अनेक शब्द सामान्य वाचकांना अनोळखी झाले असतील, या भावनेतून रा.वि. मराठे यांनी ‘गांवगाडा’चा शब्दकोश लिहून प्रकाशित केला. (मंजिरी मराठे, मुंबई, १९९०). पुस्तकाला पन्नास …